अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, सोमवारी 'शरण - गुरू चरण' नृत्यशैलीमधून आभा वांबूरकर, स्मिता महाजन यांच्या गुरू वंदन कार्यक्रमाने ८ वे पुष्प झाले. या सदाबहार आगळ्या- वेगळ्या नृत्य कार्यक्रमाने श्रोतेगण भारावून गेले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रिसिजन कॅमशाफ्टचे चेअरमन यतीन शहा, अध्यक्षा सुहासिनी यतीन शहा, सोलापूर भाजप शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे धनंजय महाराज पुजारी, डॉ. मंजुषा मेंथे, डॉ. सायली बंदीछोडे, सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर अचिंतकुमार, सोलापूर, युनियन बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी आबासाहेब डिसले, अन्नछत्रचे विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, राजेश निलवाणी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती. या नृत्यामध्ये भरत नाट्यम्, कथ्थक, कथकली, मणिपुरी, ओडिसी, कुचीपुडी, मोहिनीअट्टम, सत्रिया याबरोबरच लोकनृत्य आदी नयनरम्य अदाकारी सादर झाली.
याप्रसंगी सादरकर्ते - गुरू आभा वांबूरकर, गुरू स्मिता महाजन यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्यावतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन झाले. यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जन्मेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, स्वामिनीराजे अमोलराजे
भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्ज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, सुनंदा अष्टगी, क्रांती वाकडे, अनिता गडदे, रोहिणी देशपांडे, धनश्री पाटील, दिव्या मोरे, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शीतल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त भाऊ कापसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी स्वागत व आभार मानले.
चौकट
गुणीजन गौरव पुरस्कार
डॉ. रामलिंग काशीनाथ पुराणे (मुरूम, सामाजिक), राजू जिवलु पवार, (चालक, एस.टी. महामंडळ), इम्रान गफूर पठाण (वायरमन, एमएसईबी) यांचा न्यासाच्यावतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. १० वी व १२ वी परीक्षेत गुणवंतांचाही सत्कार करण्यात आला.
संस्कृती परंपरा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ दिवसांपासून धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत, ही आनंदाची बाब. या कार्यक्रमात शास्त्रीय नृत्यालादेखील महत्त्व देत 'शरण- गुरू चरण' हा कार्यक्रम करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून संस्कृती परंपरा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत आहे.
- आभा वांबूरकर, नृत्य सादरकर्ते
0 Comments