Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यात विखुरलेल्या घडशी समाजाला न्याय देण्यासाठी शासनाने बैठक आयोजित करावी- आ. रणजितसिंह मोहिते पाटील

राज्यात विखुरलेल्या घडशी समाजाला न्याय देण्यासाठी शासनाने बैठक आयोजित करावी- आ. रणजितसिंह मोहिते पाटील


अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रात बहुतांश सर्वच जिल्ह्यात घडशी समाज विखुरलेला असून या समाजाची राज्यातील लोकसंख्या सुमारे २.५० लाख ते ३ लाख एवढी आहे.या समाजाचा मुख्य व्यवसाय गावातील मंदिरात झाडलोट करून पहाटे मंदिरात सनई,चौघडा,नगारा वाजवणे व देवाचा नैवद्य वाजत गाजत आणणे असा असुन घडशी समाजाला देवाच्या पाऊता जवळ मान आहे.घडशी समाजातील काही लोक संगीत क्षेत्रात कलाकार,गायक,वादक म्हणून ही परिचित असून हा समाज थोड्या थोड्या स्वरूपात राज्यभरात विखुरलेला असल्याने या समाजास आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही.त्यामुळे  आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत आवाज उठवत या समाजाला न्याय देण्यासाठीचा विषय विधानमंडळाच्या पटलावर आणला आहे.

मोहिते पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की घडशी समाजाला न्याय देण्यासाठी विशेष मागास प्रवर्ग देण्यात यावा,तसेच या समाजाला अल्पसंख्यांक व आर्थिक दुर्बल घटक म्हणून घोषित करण्यात यावे,या समाजातील कलाकारांना आर्थिक सहाय्य मिळावे,राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये घडशी समाजातील लोकांची मानधनावर नियुक्ती करावी,तसेच या समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकाना उद्योग,व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे,घडशी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे,तसेच शासन दरबारी किंवा महामंडळावर प्रतिनिधित्व मिळावे अशा विविध मागण्या विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी या समाजाकडून वारंवार शासनदरबारी करण्यात येत आहेत त्याची दखल घेण्यात यावी.

सरकारने घडशी समाज्याच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून शासनदरबारी बैठक आयोजित करावी व या समाजाला न्याय देण्यासंदर्भात निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी अशी विनंती विधान परिषद सभागृहाच्या माध्यमातून केली आहे.त्यामुळे या समाजाला आता शासनदरबारी न्याय मिळण्याच्या अशा निर्माण झाल्या असून घडशी समाजातून आ.मोहिते पाटील यांचेप्रति आभाराची भावना व्यक्त होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments