Hot Posts

6/recent/ticker-posts

शाळाबाह्य सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष

 शाळाबाह्य सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष   



 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, त्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडे नसल्याने विभागाकडून शाळाबाह्य सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे.   एक ते 15 जुलै दरम्यान जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले होते. ते सर्वेक्षण पूर्ण होऊन आठ दिवसात कालावधी पूर्ण झाला आहे. तरीही प्राथमिक शिक्षण विभागाकडे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती नसल्याने विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

शासनाने शाळेत कधीच दाखल न झालेली बालके, शाळेत प्रवेश घेतलेली परंतु प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेले, एका महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थित राहणे, कुटुंबांसोबत स्थलांतरित झालेल्या मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेच्या प्रवाहात आणावे, असे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेने सर्वेक्षण पूर्ण करून शाळा बाह्य मुलांचे आकडेवारी जाहीर केली आहे. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अद्यापही आकडेवारी देण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यात किती शाळाबाह्य विद्यार्थी आहेत, याची माहिती अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

तालुकास्तरावरील अधिकार्‍यांचे दुर्लक्ष शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेच्या प्रवाहात आणणे हे महत्त्वाचे काम शिक्षण विभागाचे आहे. मात्र, तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकार्‍यासह इतर शिक्षण विभागातील अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे शिक्षण विभाग वेळीच सावध होण्याची गरज आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments