सन्मानाने आले तर महापालिका निवडणूकांत आम्ही काँग्रेससोबत युती करू- फारूक शाब्दी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरात एमआयएम पक्षाची पत्रकार परिषद घेत शहर अध्यक्ष तसेच राज्य कार्याध्यक्ष फारूक शाब्दी यांनी मोठे विधान केले आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षा सोबत युती करणार का?या प्रश्नावर फारूक शाब्दी यांनी स्पष्ट सांगितलं,काँग्रेसवाले अगर सन्मानाने युती करण्यासाठी आमच्याकडे आले तर आम्ही जरुर युती करू आणि सोबत महापालिका निवडणूका लढू असे जाहीरपणे सांगितलं आहे.त्यामुळे काँग्रेस नेते काय निर्णय घेतील याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत दोन वेळा नशीब अजमावणारे फारूक शाब्दी यांना विधानसभा निवडणुका झाल्याबरोबर एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असद ओवेसी यांनी फारूक शाब्दीकडे राज्य कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.दोनच दिवसांपूर्वी परभणी येथे झालेल्या सभेत फारूक शाब्दी याना मुंबई शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.फारूक शाब्दी यांच्याकडे सोलापूर शहर आणि मुंबई शहर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
बुधवारी सायंकाळी एमआयएम पक्षातर्फे मुंबई आणि सोलापूर शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या अध्यक्षतेखाली राहत कॉम्प्लेक्स या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली.पत्रकार परिषदेत फारूक शाब्दी यांनी सोलापूर शहरकार्यकारिणी जाहीर केली.
0 Comments