Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राची दिव्या देशमुख बनली जगज्जेती!

 महाराष्ट्राची दिव्या देशमुख बनली जगज्जेती!




नवी दिल्ली (वृत्त सेवा):- बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखने इतिहास रचत जगज्जेतेपद पटकावले आहे. दिव्याने अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या कोनेरू हम्पीचा पराभव केला आहे. हिंदुस्थानी बुद्धिबळच नव्हे तर हिंदुस्थानी क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची गोष्ट घडलीय.

जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या 19 वर्षीय दिव्याची लढत कर्नाटकच्या अनुभवी कोनेरू हम्पीसोबत होणार होती. दिव्याने अंतिम सामन्यात कोनेरूला टफ फाईट देत विजेतेपद पटकावले आहे. विश्वविजेती ठरणारी ती पहिली महिला बुद्धीबळ स्पर्धक ठरली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments