Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात सात लाख पेक्षा अधिक वारकरी विश्रांतीला

 मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात सात लाख पेक्षा अधिक वारकरी विश्रांतीला





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात आत्तापर्यंत 55 जर्मन हॅगर निवारा कक्षात सात लाख पेक्षा अधिक भाविकांनी विश्रांती घेतली आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभागाने राबविलेल्या उपक्रमास वारकरी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे संकल्पनेतील जर्मन हॅंगर मंडपात हदीरो भाविकांची विश्रांती साठी रिघ लागली आहे. 
पालखी मार्गाच्या कडेला मुळेल त्या झाडाखाली दुपार ची व रात्रीची विश्रांती घेणारे भाविकांना मुख्यमंत्री वारकरी सुविधा कक्ष आधार बनला आहे. 
जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शना खाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर  यांनी विशेष लक्ष घालून ही उपक्रम तडीस नेला आहे. 
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रथम प्राधान्य असलेल्या या निवारा केंद्रात सात लाखा पेक्षा अधिक भाविक विश्रांतीला आहेत. धर्मपुरी कारूडे पासून ते वाखरी पर्संत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर १ लाख स्केअर फुटातसह जर्मन हॅंगर मंडप उभारण्यात आले आहेत. याला मुख्यमंत्री सहाय्यता निवारा कक्ष असे नाव दिले आहे. मंडपाचे समोर भव्य स्वागत कमानी आहेत. आत हिरवा मॅट टाकणेत आला आहे. हिरकणी कक्ष, मोबाईल चार्जींग सुविधा, चरण सेवा (फुट मसाजर ) वैद्यकीय कक्ष , बाजूसा शौचालयाचू व स्नान गृहाची सुविधा स्वतंत्र करणेत आली आहे. आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बोरगाव येथे पाहणी केली. 
तसेच ग्रामविकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी वाखरी येथील निवारा केंद्राची पाहणी केली.
जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत 11 जलावरोधक मंडप व 55 जर्मन हँगर मंडप उभारणी चे काम करणेत आले आहे.

ग्रामविकास विभागाच्या उपक्रमास वारकरी यांचा उदंड प्रतिसाद

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे संकल्पनेतील या उपक्रमास वारकरी यांचा उंदड प्रतिसाद आहे. पालखी सोहळा आलेनंतर लोक जागा घरून विश्रांती साठी बसतात. बाजूस मोबाईल चार्जिग ची सुविधा करणेत आली आहे. टॅंकर ने पिण्याचे शुध्द पाण्याची सोय करणेत आलेली आहे.या मंडपात सात लाखापेक्षा अधिक भाविकांना मुख्यमंत्री सहाय्यता निवारा कक्षाचा आधार मिळाला आहे. सुरक्षित ठिकाणामुळे महिलांची पालखी सोहळ्यातील संख्या वाढत आहे.

मोबाईल चार्जिग व एलईडी सुविधा

एकाच वेळी 200 मोबाईल चार्जिंग करण्याची सुविधा या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निवारी कक्षात करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आलेला असून वेगवेगळी भक्ती गीते व स्वच्छतेविषयी तसेच भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांविषयी माहिती देण्यात येत आहे. यामध्ये थेट विठ्ठल दर्शन ची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामुळे भाविकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध झाल्याने वारकरी आनंदित आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments