उजनी दोन दिवसांत १०० टक्के भरणार
पुणे(कटूसत्य वृत्त):- पुणे जिल्ह्यातील २५ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे घाट भागातील २५ धरणांपैकी १९ धरणांतील पाणीसाठा जवळपास
७० ते ८० टक्क्यांहून अधिक जमा झाला आहे. त्यामुळे भीमा, भामा, इंद्रायणी तसेच मुळा-मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. या पाचही नद्यांममधून उजनी धरणात सातत्याने पाण्याचा येवा येत आहे. दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल ६० टीएमसी पेक्षा अधिक पाणी आले आहे. जलसंपदा विभागाच्या १२ जुलैच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ९४.३० टक्के पाणीसाठा (५०.
५२ टीएमसी) जमा झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत उजनी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.
सध्या पुणे जिल्ह्यातील २५ धरणांपैकी चार धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर १९ धरणांतील पाणीसाठा ७० ते ८० टक्क्यांहून अधिक जमा झाला आहे. तर उजनी धरणात येत्या दोन दिवसांत
भरण्याच्या मार्गावर असल्याने सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. पुणे, सोलापूर, आहिल्यानगरचा (अहमदनगर) काही भाग तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागासाठी उजनी धरण जीवनदायनी आहे. या धरणातील पाणीसाठा ९४.३० टक्के झाला आहे.
तब्बल ११७ टीएमसीचाnपाणीसाठा असलेल्या उजनीbधरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांसाठी हे अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. उजनीत मृतसाठा आणि वापरायोग्य साठा असा एकूण ११५ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. दीड महिनापूर्वी वजा ( मायनस ) असलेले उजनी धरण पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावरील महिनाभरापासूनच्या संततधार पावसामुळे प्लसमध्ये येऊन ९४.३० टक्के भरले आहे. त्यामुळे दीड महिन्याच्या कालावधीत उजनीत जवळपास ६० टीएमसी पेक्षा अधिकचा पाणी आले आहे.
चौकट
■ उजनी धरण एकूण प्रकल्प क्षमता : ११७ टीएमसी
■ उजनी धरण एकूण मृतसाठा : ६३.४३ टीएमसी
■ उजनी धरण एकूण उपयुक्त साठा: ५३.५७ टीएमसी
■ सध्या पाणीसाठा जमा : ११५ टीएमसी
■ सध्या वापरा योग्य साठा : ५०.५२ टीएमसी
■ सध्याची एकूण टक्केवारी : ९४.३० टक्के
0 Comments