अकलूज येथे 7 जुलै रोजी हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा कीर्तन सोहळा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- लोकनेते कै.प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे पुण्यतिथी निमित्त, महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे वतीने, समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या भव्य हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कीर्तन सोहळा विजय चौक अकलूज येथे सोमवार दिनांक ७/७/२०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १०.० वाजेदरम्यान होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
मागील ९ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे वतीने समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरीकिर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे. याचबरोबर जनसेवा संघटना व सोलापूर जिल्हा तालीम संघाचे वतीने महाराष्ट्र केसरी पै.वेताळ शेळके यांचा एक लाख रुपयांची देणगी व सन्मानचिन्ह तसेच त्यांच्या आई वडिलांचा संपूर्ण कपड्यांचा आहेर देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
त्याच बरोबर शाहीर राजेंद्र कांबळे यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार मिळाले बद्दल सहकुटुंब सहपरिवार सत्कार करण्यात येणार आहे.
ह.भ.प.अशोक शिंदे महाराज गुरसाळेकर यांचा सोनी TV मराठी वरील आयोजित केलेल्या "कोण होणार महाराष्ट्राचा लाडका किर्तनकार" स्पर्धेत उप विजेते झालेबद्दल सहकुटुंब सहपरिवार सत्कार करण्यात येणार आहे.
यासह विविध संस्थेच्या वतीने लोकनेते कै.प्रतापसिंह मोहिते -पाटील यांचे पुण्यतिथी निमित्त अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
तरी सर्व नागरीकांनी वेळेवर उपस्थित राहुन या हरिकीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ .धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे.
0 Comments