मोहिते पाटील यांचा बलराज देहूकडे रवाना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 19, 2025

मोहिते पाटील यांचा बलराज देहूकडे रवाना

 मोहिते पाटील यांचा बलराज देहूकडे रवाना



अकलूज (कटूसत्य वृत्त):- जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांचा मानाचा अश्व बलराज याचे देहूकडे प्रस्थानापूर्वी विधिवत पूजन करण्यात आले.

गत ४० वर्षांपासून मोहिते पाटील यांच्या अश्वाला रिंगण सोहळ्यात धावण्याचा मान मिळतो आहे. बलराज या अश्वाबद्दल बोलताना डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले, बलराज हा अश्व जयपूर राज घराण्यातील अश्वाच्या कुलतील एक अश्व आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाचा अश्व असल्यामुळे त्याच्या खाण्या पिण्याची वर्षभर योग्य काळजी घ्यावी लागते. समतोल खुराका बरोबरच योग्य व्यायाम करून घ्यावा लागतो. लाखो लोकांच्या गर्दीतून चालताना कोणाला इजा पोहोचवू नये याचे शिक्षण द्यावे लागते.

अश्वपुजना प्रसंगी सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पदमजादेवी मोहिते पाटील, आण्णासाहेब इनामदार, माणिकराव मिसाळ, आण्णासाहेब शिंदे,सतीश पालकर,सुधीर रास्ते,मयुर माने,चंद्रकांत कोळेकर,नवनाथ साठे,राजु गुळवे,ज्योती कुंभार, जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages