अकलूज मध्ये सर्रास होत आहे स्वस्त धान्यांचा काळाबाजार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 16, 2025

अकलूज मध्ये सर्रास होत आहे स्वस्त धान्यांचा काळाबाजार

 अकलूज मध्ये सर्रास होत आहे स्वस्त धान्यांचा काळाबाजार



"हॉटेल धंदे, भुसार मालाचे व्यापारी तर राईस नाश्ता विक्रेते यांच्याशी जुळली नाळ"

अकलूज (विलास गायकवाड):- अकलूज मधील दोन,तीन स्वस्त धान्य दुकाने सोडली तर सर्रास शासकीय धान्याचा काळाबाजार करण्याचा कारनामा आणि महापाप,अकलूज मधील स्वस्त धान्य दुकान चालकच करत असून,काही हॉटेल धंदेपासून,काही भुसार मालाचे व्यापारी, तर काही राईस नाश्ता विक्रते यांच्याशी धान्य काळा बाजाराची नाळ जोडली गेली आहे.यामुळे सदरची बाब अत्यंत गंभीर होत चालली असून,पुरवठा विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे असे राशन ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
          अकलूज मध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय धान्याचा काळा बाजार होतो आहे हे अकलूजच्या पंचक्रोशीला माहीत आहे. केवळ स्वस्त धान्य दुकान चालकांच्या गुंडवृत्ती पार्श्वभूमीमुळे,स्वस्त धान्य दुकानदार यांच्या विरुद्ध कोणीही तक्रार करण्यास पुढे येऊ शकत नाही, अशी खंत काही ग्राहकांमधून व्यक्त होताना दिसत आहे. आम्ही जर स्वस्त धान्य दुकानदार यांच्या विरुद्ध तक्रार केली आणि ते लोक आमचेशी बरे वाईट वागले तर अशी भीतीही काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
      समस्त मानव जातीवर काही वर्षांपूर्वी कोरोनाने केलेले आक्रमण आणि धडकी भरवणारे लॉकडाऊन, हे अखंड आयुष्य कोणीही विसरू शकणार नाही. कारण उपासमारीची खरी किंमत, ज्यांची हातावरची पोटे होते त्यांना माहित आहे आणि यापैकी कित्येक गोरगरीब जनतेचा उदरनिर्वाह स्वस्त धान्य दुकानातील धान्यावर होत आहे.असे असताना तरीही स्वस्त धान्य दुकानदार यांना गरीब ग्राहकांबद्दल पाझर फुटत नाही.याकडे आता जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असे मत काहींनी व्यक्त केले आहे.  काही दिवसापूर्वी माळशिरस तहसीलदार सुरेश सेजुल यांना विचारण्यात आले होते की,अकलूज मधील गरीब जनतेला वेळेवर शासकीय धान्य मिळत नाही, सदरचे लोक गुंडवृत्तीचे असल्यामुळे, त्यांची तक्रार कोणी करू शकत नाहीत. याबद्दल माळशिरस तहसीलदार सुरेश सेजुल म्हणाले होते, दुकानदारांची चौकशी करून, नियमानुसार कारवाई करण्यात येईल परंतु अद्याप कारवाईचा विषय  गुलदस्त्यातच आहे असे वाटते?

*चौकट*
अकलूज शहरामध्ये सध्या काही रेशन दुकानदार वगळता, कोणताच दुकानदार शिधा धारकांना वेळेवर धान्य देत नाहीत. यापूर्वी काही सामाजिक संघटना व राजकीय पक्षाकडून उठाव करूनही परिस्थिती जैसे थे आहे. सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी व तालुका पुरवठा निरीक्षक योग्य अशी कारवाई करत नसल्याने रेशन धारकांची मुजोरी सुरू आहे. राज्याचे नागरी पुरवठा मंत्री व पालकमंत्री यांनी रेशन दुकानदारांच्या भोंगळ कारभारावर अंकुश ठेवणे जरुरी आहे.
*मोहसीन शेख* 
*माळशिरस विधानसभा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शप)*

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages