जिल्हा परिषद प्रशासनाची पालखी सोहळ्या साठी जय्यत तयारी - सिईओ जंगम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 16, 2025

जिल्हा परिषद प्रशासनाची पालखी सोहळ्या साठी जय्यत तयारी - सिईओ जंगम

 जिल्हा परिषद प्रशासनाची पालखी सोहळ्या साठी जय्यत तयारी - सिईओ जंगम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी पालखी सोहळा -  2025 जिल्हा परिषद प्रशासनाने पालखी सोहळ्या साठी जय्यत तयारी करणेत आली असल्याची  माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. 
जिल्हा परिषदेत आज आषाढी यात्रे निमित्त भाविकांना देणेत येणारे सुविधांची माहिती देणे साठी पत्रकार परिषदेचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते. 

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांचे मार्गदर्शनाखाली विविध सुविधा देणेत येत आहेत. त्यांनी पुढाकार घेतले मुळे पालखी मार्गांनी निगडीत १६ रस्ते मंजूर झाले आहेत. असेही सिईओ जंगम यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचे मार्गदर्शन घेणेत येत असून कामाचे टप्पे ठरवून देऊन कामाचे सनियंत्रण करणे साठी अॅप तयार करणेत आले असल्याचे सिईओ जंगम यांनी सांगितले. 
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, आळंदी, जि. पुणे,  श्री. संत तुकाराम महाराज, देहू, जि. पुणे , श्री. संत मुक्ताबाई, मुक्ताबाई, जि. जळगांव, श्री. संत सोपान महाराज, सासवड, जि. पुणे, श्री. संत निवृत्तीनाथ महाराज, त्र्यबकेश्वर, जि. नाशिक, श्री. संत एकनाथ महाराज, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, श्री. संत नामदेव महाराज, पंढरपूर, जि. सोलापूर, श्री. विठ्ठल रुखमाई संस्थान, कौंडण्यपूर, जि. अमरावती , श्री. संत चांगावटेश्वर देवस्थान, सासवड, जि. पुणे, श्री. संत निळोबाराय महाराज, पिंपळनेर, जि. अहिल्यानगर या प्रमुख पालख्या सोहळ्या समवेत येणारे भाविक व मार्गावरून समवेत येणारे सर्व दिंड्यां मधील भाविकांची सुविधा करणेत आलेली आहे. 

पालखी मार्गावर जिल्ह्यातील एकूण 81 ग्रामपंचायतीचा सहभाग असून सदर पालखी मार्गाची लांबी 120 किलोमिटर आहे. मागील वर्षी 76 वारकरी सुविधा केंद्र होते, यंदाच्या वर्षी 103 वारकरी सुविधा केंद्र मंजुर करण्यात आलेली आहेत. मागील वर्षी 31 जलावरोधक मंडप (3,15,000 Sft) होते व यंदाच्या वर्षी 94 जलावरोधक मंडप (4,92,875 Sft) व 9 जर्मन हँगर मंडप (2,20,000 SfT) मंजुर करण्यात आलेले आहेत. सदर पालखी सोहळ्याकरिता 536 अधिकारी व 4212 कर्मचारी वृंद यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 

*स्वच्छता व अनुषंगिक   सेवा*

सुविधांकरिता मागी वर्षी फिरते शौचालय 3925 होते, या वर्षी  4315 फिरते शौचालय व त्यासाठी 325 स्वच्छता सेवकांची नेमणूक व 114 सक्शन व जेटिंग मशीन तयार ठेवण्यात आले. 

*पाणी पुरवठा विभाग*

पाण्याचा विचार केला असता मागील वर्षी 211 पाणी टँकरची व्यवस्था करण्यात आलेली होती. यंदाच्या वर्षी 234 पाणी टँकर व टँकर भरणेकामी 791 स्त्रोत निश्चित करण्यात आलेले आहे. मागच्या वर्षी व 102 पाणी उदभव स्त्रोत निश्चित करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी  112 पाणी उदभव स्त्रोत निश्चित करण्यात आलेले आहेत.
महिला वारकरीकरिता मागील वर्षी 1100 स्नान गृह व 91 हिकरणी कक्ष स्थापन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी 1824 महिला स्नान गृह व 110 हिकरणी कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. 
*आरोग्य विभाग*
वारीमध्ये आरोग्य सुविधांबाबत मागील वर्षाकरिता 11 अतिदक्षता विभागाची निवड करण्यात आलेली होती. यंदाच्या वर्षी  21 अतिदक्षता विभाग निवड करुन 121 आरोग्य दुत(बाईक ऍबुलन्स) वारीकरिता तयार ठेवण्यात आले आहे.

*ग्रामपंचायत विभाग*

ग्रामपंचायत विभागामार्फत  पालखीतळ, पालखी मार्ग व परिसर स्वच्छ करुन घेणे, विद्युत पुरवठयाची सोय, विदयुत रोषनाई करणे, 5 दिवस मुक्कामाच्या ठिकाणी बोरगांव, वेळापुर, पिराची कुरोली, भंडीशेगाव व वाखरी येथे ड्रोजची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पालखीतळ व मार्गावरील अतिक्रमण काढणे, जंतूनाशक फवारणी पावडर धुरळणी इ. प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे काम सुरु आहे. तात्पुरते स्वच्छता कर्मचारी नेमणूक करुन पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर गावात झालेल्या कचरा व घाणीचे निर्मुलन करण्याचे नियोजीत आहे. ग्रामपंचायतीमार्फत हिरकणीकक्ष, स्नानगृह, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, मसाज सुविधा, मोबाई चार्जिंग पाँईट इ. गावात देण्यात येणाऱ्या सुविधाचे लोकेशन अंतिम करुन मॅप करण्याचे काम सुरु आहे.वारकऱ्यांच्या सोईकरिता दिशा दर्शक फलक 15 फुट उंचीवर लावण्यात आलेले आहेत.
*पाणी व स्वच्छता विभाग*
पाणी व स्वच्छता विभागामार्फत आषाढी वारी  पालखी सोहळ्यामध्ये 10 मानाच्या पालख्यांनाकरिता 60 ठिकाणी 4315 तात्पुरते शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 10 शौचालयापाठीमागे (200 लिटरचे) एक ड्रम याप्रमाणे 4315 शौचालयासाठी 432 ड्रम निश्चित करण्यात आलेले आहे. मैलगाळ व्यवस्थापनासाठी 57 सक्शन मशीन, 57 जेटींग मशीन तयार ठेवण्यात आले आहे. विभागामार्फत 1500 स्वच्छता व साफसफाई स्वंयसेवक नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच तात्पुरते शोचालय व्यवस्थापनासाठी पुरवठादारामार्फत एकावेळी 283 कर्मचारी, 42 पर्यवेक्षीय कर्मचारी नेमले जात आहेत. सदर वारीकरिता जिल्हास्तरावरुन 6 अधिकारी वर्ग, 31 जिल्हास्तरीय कर्मचारी व 86 विस्तार अधिकारी व ग्रामसेवक असे एकूण 123 अधिकारी व कर्मचारी नेमले जातात.
*महिला व बाल विकास विभाग*

महिला व बाल विकास विभागामार्फत 110 हिकरणी कक्ष, महिलासाठी बेड, सॅनिटरी पॅड व्हेंडींग डिस्पोजर मशीर, लाईट, पंखे, मेंट, खुर्ची, स्वच्छ पिण्याचे पाणी, कमरापेटी, स्तनदा मातांसाठी गोपनीय कक्ष या करिता 476 अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
आरोग्य विभागामार्फत प्रति 3 किलोमीटर अंतरावर 143 आरोग्य सल्ला व उपचार केंद्रांची स्थापना, 58 रुग्णवाहिका (102 आणि 108) दिंडी सोबत 121 आरोग्य दुत (बाईक ॲब्युलन्स), पालखी मार्गावर 16 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आधुनिक वैदयकिय उपकरणे व वैदयकिय फर्नीचर खरेदी करुन सुसज्ज असे स्वतंत्र उपचार कक्ष स्थापन करण्यात येत आहे. दिंडी प्रमुखांना 4500 औषधोपचार किटचे वाटप, 1230 अधिकारी / कर्मचार व 2529 आशा वर्कर यांची नेमणूक करण्यात येत आहे. आरोग्य विभागाअंतर्गत 2468 बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आषाढी वारीसाठी 350.00 लाख रुपये औषध खरेदीकामी निधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

*बांधकाम विभाग*

बांधकाम विभागामार्फत 94 जलावरोधक मंडप (4,92,875 Sft) व 9 जर्मन हँगर मंडप (2,20,000 SfT) उभारणी करण्याचे काम सुरु आहे. 41 बाह्य रस्ते व पालखी तळ सुधारणाचे काम सुरु  करणेकरिता र. रु. 230.00 लक्ष व 30 रस्त्याचे व पुल दुरुस्तीचे कामाकरिता र. रु. 380.00 लक्ष ग्रामविकास विभागामार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे. पालखी मार्गावरील 82 ग्रामपंचायतीतील मुक्कम, विसावा पालखीतळ व मार्ग अतिक्रमण काढण्याचे काम सुरु आहे.  
जिल्हा परिषदेच्या कृति कार्यक्रमाअंतर्गत 1 महिना, 15 दिवस व 8 दिवस अगोदर पाणी स्त्रोतांचे सर्व्हेक्षण व पाणी नमुने तपासणी व फेर तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.  टँकर व तात्पुरते शौचालय करिता रस्त्यांचे सर्व्हेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.  15 दिवस अगोदर पालखी तळ रस्ते सुधारणा व जंतुनाशक फवारणी पावडर धुरळणी करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 8 दिवस अगोदर स्वच्छते विषयी हॉटेल तपासणी, पाणी स्त्रोतांचे व टँकर भरणा ठिकाणाचे शुध्दीकरण करुन घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 5 दिवस आगोदर हॉटेल कामगारांची वैदयकिय तपासणी , ॲबेटींग व गटार आणि घाण पाण्यावर डस्टींग इ. कामे करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 3 दिवस आगोदर हॉटेल पाण्याची ओ.टी. तपासणी, स्नान गृह, हिरकणी कक्ष, आपती व्यवस्थापन कक्ष, आरोग्य केंद्र यांची स्थापना करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी जलावरोधक मंडप उभा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. आषाढी वारीच्या एक दिवस अगोदर दिंडी प्रमुखांना औषधोपचार किटचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पालखीतळ सजावट (रांगोळी, दिशा, दर्शक फलक, विद्युत रोषणाई इ.) करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
*जिल्हा परिषदेमार्फत नाविण्य उपक्रम*

 वाकऱ्यांकरिता गर्दीच्या सनियंत्रणासाठी पालखीतळावर ड्रोनचा वापर, मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी 400 फुट मसाजर तसेच विठ्ठल उर्जा रथ वारकऱ्यासांठी 4 फिरते मोबाईल चार्जिंग सुविधा (1 विठ्ठल उर्जा रथामध्ये 100 चार्जिंग पॉईट) इ. सोई-सुविधा देण्याकरिता नियोजन करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages