ग्रीनफिंगर्स कॉलेजच्या 64 विद्यार्थ्यांची TCS मध्ये निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 16, 2025

ग्रीनफिंगर्स कॉलेजच्या 64 विद्यार्थ्यांची TCS मध्ये निवड

 ग्रीनफिंगर्स कॉलेजच्या 64 विद्यार्थ्यांची TCS मध्ये निवड

अकलूज (कटूसत्य वृत्त):- श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट व शिवरत्न शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कॅम्पस ड्राईव्हमध्ये ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी, अकलूज येथील 64 विद्यार्थ्यांची निवड TCS कंपनीमध्ये झाली आहे, तसेच 12 विद्यार्थ्यांना इतर नामांकित कंपन्यांमध्ये संधी प्राप्त झाली आहे. एकूण 76 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाल्याने महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण आहे.76 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली ही बाब खूपच प्रेरणादायी आहे. TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) सारख्या नामांकित IT कंपनीमध्ये 64 विद्यार्थ्यांची निवड होणे ही संस्थेच्या गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीची पावती आहे. त्याचप्रमाणे इतर 12 विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळणे हेही कौतुकास्पद आहे.
महाविद्यालयातील यशाची परंपरा कायम राखत यंदाही मोठ्या प्रमाणात निवड झाल्याचे यामधून दिसून येते. यामागे कॉलेजच्या आधुनिक सुविधा, रम्य व अभ्यासासाठी पोषक परिसर, आणि नेहमी मार्गदर्शन करणारे अनुभवी प्राध्यापक यांचा मोठा वाटा आहे. 
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत 1300 हून अधिक विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी प्राप्त झाली आहे, ही संस्थेच्या गुणवत्तेची साक्ष देणारी बाब आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच ॲप्टिट्यूड टेस्ट, स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि अ‍ॅडऑन कोर्सेस आयोजित केले जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित होऊन, दरवर्षी विविध कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निवड होत आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट चे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, कार्याध्यक्ष आ. रणजितसिंह मोहिते पाटील, सचिव खा. धैर्यशील मोहिते पाटील, उपाध्यक्षा सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील, चेअरमन ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज विश्वतेजसिंह मोहिते पाटील, सहसचिव शिवदास शिंदे, ट्रस्टचे सर्व संचालक मंडळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, प्राचार्य, शिक्षकवृंद व शिक्षकेतर सेवक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages