'पत्रकारांनी स्वतःच्या कुटुंबासाठीही वेळ द्यावा'- नलावडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 16, 2025

'पत्रकारांनी स्वतःच्या कुटुंबासाठीही वेळ द्यावा'- नलावडे

 'पत्रकारांनी स्वतःच्या कुटुंबासाठीही वेळ द्यावा'- नलावडे




बार्शी (कटूसत्य वृत्त):- पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. पत्रकारांना समाजातील सर्वच घडामोडीबाबत जागृत राहून महत्त्वाचे कर्तव्य पार पाडावे लागते. परंतू स्वतःच्याच कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता पत्रकारांनी आपल्या कुटुंबासाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निवृत्त शिक्षणाधिकारी व सुयश विद्यालयाचे अध्यक्ष शिवदास नलावडे यांनी येथे केले. व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्यावतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार आणि शहर, तालुक्यातील पत्रकारांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप शुक्रवारी (दि. १२) संघटनेच्या राज्य कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवृत्त तहसीलदार मदनराव वायकुळे, व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ,शाम थोरात ,अमोल आजबे, मयूर थोरात, प्रवीण पावले ,प्रदीप माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजात वावरत असताना पत्रकारांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. रात्री बेरात्री कोणतीही घटना घडली तरी ते सतत कार्यरत असतात. पण कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. मात्र पत्रकारांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही वेळ द्यावा, असे आवाहन नलावडे यांनी केले. स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे  म्हणाले, मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आपल्या मुलांसोबत मैत्रीपूर्ण वातावरण ठेवावे, असे स्पष्ट केले. प्रस्ताविकात अजित कुंकूलोळ म्हणाले, बार्शीत केवळ संघटनेतील सदस्य असलेल्या पत्रकारांच्या पाल्यांनाच नव्हे तर तालुक्यातील सर्वच पत्रकारांच्या १०० मुलांना सुमारे एक लाख रुपयांचे शालेय साहित्य वाटप केले आहे. जिल्यात पहिल्यांदाच हा उपक्रम राबवल्याचे कुंकूलोळ यांनी सांगितले.  सूत्रसंचालन संदीप अलाट यांनी केले तर आभार शाम थोरात यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश झिंगाडे,  विजय शिंगाडे, समाधान चव्हाण ,विक्रांत पवार ,ओंकार हिंगमीरे ,जमीर कुरेशी,अपर्णा दळवी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 
*******************************
चौकट : 
या गुणवंतांचा झाला सन्मान 
डॉ. साक्षी प्रशांत काळे (फिजिओथेरपिस्ट),   साक्षी प्रदीप माळी, सिद्धांत अमोल आजबे, संस्कृती सिद्धांत बसवंत, वेदांत सचिन वायकुळे,  हर्षद आनंद शेटे, तन्वी उमेश काळे, सुरभी चंद्रकांत करडे  या दहावी, बारावीच्या गुणवंत मुलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages