दरवाढीमुळे आई-बाबांचे टेन्शन वाढले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 16, 2025

दरवाढीमुळे आई-बाबांचे टेन्शन वाढले

 दरवाढीमुळे आई-बाबांचे टेन्शन वाढले 



 राज्यातील बाजारात गर्दी: शालेय वस्तूवर वर्षभराची बचत एका महिन्यात संपणार 

मुबंई (कटूसत्य वृत्त):- आधीच वाढलेल्या महागाईमुळे घर खर्च करताना आखडता हात घेणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांना आता शालेय साहित्याच्या झालेल्या वीस ते पंचवीस टक्के एवढ्या दरवाढीमुळे विवचंनेत टाकले आहे.
   मागील दोन वर्षानंतर वह्या, पुस्तके, पेनसह शैक्षणिक साहित्याच्या दराची तुलना केली, तर यंदा तर वाढले आहेत. जीएसटीदेखील वाढली असल्याने स्टेशनरीवर त्याचा परिणाम झाला आहे. स्टेशनरी वरील 12 टक्क्यांची जीएसटी 18 टक्क्यावर गेली आहे, परिणाम स्वरूप शैक्षणिक साहित्यात 20 ते 25 टक्के दरवाढ झाल्यामुळे बाबांचा खिसा रिकामा होत आहे.
     कागदाचा तुटवड्यामुळे शालेय वह्यांच्या किमतीत 40 ते 50 टक्के दरवाढ झाली आहे. याचा फटका पालकवर्गाला बसत  असून, मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेली राखीव पुंजी महागाईमुळे या वर्षात खर्च करणे भाग पडत आहे. 50रुपयाला मिळणारी साधी कंपास पेटी 70ते 80 रुपयांना मिळत आहे. खोडरबर दोन रुपयाला मिळत होता आता ते पाच रुपयांना मिळतो.

चौकट :- 
 स्कूल बॅगच्या किमती वाढल्या 
 आडव्या स्कूलच्या जमाना संपला असून आता सॅगबॅगला विद्यार्थ्यांची पसंती आहे. मागणी वाढल्याने त्यांच्या किमती 250 ते 300 रुपयांच्या घरात आहेत. क्राफ्ट कलेसाठी लागणारे 700 आर्ट पेपर, कलर पेपर आणि इतर साहित्याचे किमती दहा रुपयांनी वाढल्या आहेत. प्रिंट आउट, झेरॉक्स व इतर  लिखाणासाठी लागणारे 70 जीएसएम ए/ फोरची रिम ही 150 रुपयांवरून 200 रुपयांवर गेली आहे.

चौकट :- 
उत्तम बॅग 400 रुपयांपर्यत
 वस्तूंच्या दरात सुमारे 20 टक्के दरवाढ आहे,
 
20%दरवाढ शाळेय साहित्यात झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages