भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही- शरद पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 18, 2025

भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही- शरद पवार

 भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही- शरद पवार



मुंबई (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात भाजपला फैलावर घेतलं. तसेच भाजपशी हातमिळवणी करणाऱ्यांचाही शरद पवार यांनी समाचार घेतला.

भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.

गांधी, नेहरू, चव्हाण, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचे असेल त्यांना सोबत घेऊ. पण सत्तेसाठी भाजप बरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. त्या दृष्टीकोणातून पावलं ही आपल्याला टाकायची आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली. पण ज्या-ज्यावेळी असं घडलं तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करू नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढेही टिकून राहणार आहे, असे शरद पवार म्हणाले.

निवडणुकीची काळजी करू नका. आपल्यासोबत जो येणार असेल, ते आपल्या विचारांशी जोडून राहणार असतील तर त्यांचा विचार वरिष्ठ करतील. मी तुम्हाला विश्वास देतो. आगामी महापालिका निवडणुकीबाबत तुम्ही चिंताच करू नका, असे सांगत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages