कांदा मार्केटमध्ये विक्रीस आल्यानंतर चोरीचे प्रकार होत असतील तर याची जबाबदारी व्यापारी, कर्मचाऱ्यांची - माने
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा मार्केटमध्ये विक्रीस आल्यानंतर चोरीचे प्रकार होत असतील तर याची जबाबदारी व्यापारी, कर्मचारी व सुरक्षारक्षकांची समजून कारवाई केली जाईल, असा सज्जड दम सभापती दिलीप माने यांनी दिला. सभापती माने यांनी कार्यालयीन वेळेपूर्वी मार्केट कमेटीमध्ये जाऊन कर्मचाऱ्यां समवेत चर्चा केली. सर्वांनी वेळचे बंधन पाळावे, कार्यालयीन कामकाज सांभाळून मार्केट कमेटी क्षेत्रात लक्ष देण्याची जबाबदारी देखील आपली आहे. शेतकरी मोठया कष्टाने कांदा व इतर माल पिकवतो, विश्वासाने बाजारपेठेत आणतो. मात्र या ठिकाणी चोऱ्यांचे प्रकार घडणे योग्य नाही.अशा तक्रारी उपलब्ध झाल्यास संबंधित आडते, व्यापारी, कर्मचारी व सुरक्षारक्षक यांना जबाबदार धरले जाईल. असे माने यांनी सुनावले. यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यासमवेत कांदा मार्केटमध्ये राऊंड मारून स्वच्छता, लाईट व्यवस्था,सुरक्षारक्षक नेमणूकीची पाहणी केली. तर लिलावावेळी त्यांनी समक्ष थांबून संवाद साधला. अडचणी देखील जाणून घेतल्या. मात्र शेतकऱ्यांच्या मालाची चोरी, वजन मापात हेराफेरी चालणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments