Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजप व काँग्रेस नेत्यांचा सकल मराठा समाजातर्फे सत्कार

 भाजप व काँग्रेस नेत्यांचा सकल मराठा समाजातर्फे सत्कार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि राज्य रेल्वे सल्लागार समितीवर नुकतीच निवड झालेले गणेश डोंगरे यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. समाजाच्या शहर कार्यालयात शुक्रवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे मुख्य विश्वस्त व माजी उपमहापौर नाना काळे, महापालिकेचे माजी परिवहन सभापती राजन जाधव, माजी नगरसेवक विनोद भोसले, सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, प्रा. गणेश देशमुख, शिवाजीराव चापले, सचिन तिकते, सचिन गुंड, शाहू महाराज सलगर, विकास वाघमारे, सचिन स्वामी, सुदर्शन यादव, सुशांत हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या वेळी समाजातील एकतेचा आणि सामाजिक सहभागाचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवड झालेल्या नेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
Reactions

Post a Comment

0 Comments