५४ मीटर रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 31, 2025

५४ मीटर रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा

 ५४ मीटर रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटल दरम्यानच्या ५४ मीटर रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दमाणी नगर येथील १०३ वर्षें जुना दगडी रेल्वे पुल लवकरच रेल्वे प्रशासन आणि NHAI मार्फत पाडण्यात येणार असून, त्यानंतर उद्भवणाऱ्या गंभीर ट्राफिक समस्येचा पर्याय म्हणून हा रस्ता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या मार्गासाठी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी गेले चार वर्षे सातत्यपूर्ण व अभ्यासपूर्ण पाठपुरावा करून सोलापूर महापालिका प्रशासन व तत्कालीन पालकमंत्री यांचे लक्ष वेधले. मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, केतन शहा, विजय कुंदन जाधव, अॅड. दत्तात्रय अंबुरे आणि मनोज क्षिरसागर,सुहास भोसले ,आनंद पाटील यांनी महापालिका अधिकारी व तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या. त्यानंतर या रस्त्यासाठी DPDC अंतर्गत भरघोस निधीची तरतूद करण्यात आली.

या मार्गातील अडथळा असलेल्या देशमुख पाटील वस्तीतील अनधिकृत १८ घरांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. त्यामुळे आता हा रस्ता रहदारीसाठी लवकरच खुला होणार आहे. सोलापूर विकास मंचच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे संपूर्ण शहराला दिलासा मिळणार आहे. आता मंचचे लक्ष सीएनएस हॉस्पिटल ते विजापूर रोड मार्ग पूर्ण करून संपूर्ण रिंगरोड विकसित करण्यावर आहे. तसेच नुसता हा रस्ता CNS Hospital पर्यंत करून भागणार नाही तर तो रस्ता सोरेगाव पर्यंत जेव्हा होईल‌ तेव्हाच रेल्वे ब्रिज पाडले तरी याचा काहीही परीणाम वाहुतुक वर‌ व छत्रपती संभाजी महाराज चौक मधुन सगळी वाहतूक बाहेरून विजापुर‌ व आसरा जुळे सोलापूर भागाकडे व्यवस्थित जाईल.

सोलापूर विकास मंचने सोलापूरकरांच्या वतीने तक्तालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, सहायक अभियंता प्रकाश दिवाणजी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages