पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेले मजूर गावाच्या दिशेने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 26, 2025

पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेले मजूर गावाच्या दिशेने

 पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेले मजूर गावाच्या दिशेने 



मुबंई (कटूसत्य वृत्त):- खेड्या पाड्यातील नागरिकांना मुबलक पाणी, रोजगार निर्मीतीची साधने पुरेसा प्रमाणात उपलब्ध नसल्याने गावापाड्यातील नागरिकांना आजही रोजगारासाठी शहरांची वाट धरावी लागत आहे. कैक निवडणूका आल्या आणि गेल्या परंतु रोजगार निर्मीतीची कामे वाढण्याऐवजी कमी झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शेतीच्या कामासाठी पूरतील एवढे तरी पैसे असावेत, यासाठी बाहेर गावी गेलेले मजूर आता हळूहळू गावाकडे परतू लागले आहेत.
      दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे भल्याभल्यांचे कंबरडे मोडले असून, भाकरीच्या चंद्रासाठी वणवण भटकणाऱ्या कुटूंबांना,आपले घर आणि घरातील वयस्कर आई - बाबांना, शाळेत शिकणाऱ्या लहान- पोरांना तसेच गावपाडे नातेवाईकांना सोडून, मुबंई, पुणे, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, रायगड, इत्यादी शेकडो मैल रोजगाराच्या शोधात भटकंती करावे लागते. ज्या शहरांच्या ठिकाणी हाताला काम मिळेल तेथे काम संपेपर्यंत आपल्या कुटूंबातील सदस्यांसह मिळेल ते काम करावा लागतो. उन्हाळयांत  जर काम धंदा केला नाही, दोन पैके कामावले नाहीत, पावसाळ्यात शेती कशी करायची आणि मुला - बाळांना शाळेचा खर्च कसे पेलाचे, असा प्रश्न या कुटूंबातीला सदस्यांसमोर असतो, त्यामुळे शहराच्या ठिकाणी मिळेल ते काम करून तूटपुंजी जमा करून आता जसजशी पावसाची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे, तसे कामधंदया साठी बाहेर गेलेला मजूर गावाच्या दिशेने यायला सुरुवात झाली आहे. गावाकडे येऊन पावसाळ्यात पुरेल इतका लाकूड फाटा घरात भरून ठेवणे, जनावारांसाठी वैरण जमा करणे, राबाकरीता पेरवे काढणे अशी असंख्य कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करायची लगबग सद्या ग्रामीण भागात दिसत आहे. निवडणूका येतात आणि जातात, पण सरकार लोकप्रतिनिधी स्थानिक पातळीवर पुरेसा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देत नसल्याने त्यांना स्थलांतरित व्हावे लागते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages