Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी बँकेत आधार क्रमांक संलग्न करावे

 मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी बँकेत आधार क्रमांक संलग्न करावे 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात "मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येते.
त्या अनुषगाने सदर योजनेतील सोलापूर जिल्हयातील 2702 लाभार्थ्यांचे आधार संलग्नित/अपडेट नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभ वितरित झालेला नाही. त्यामुळे ज्या लाभाथ्यांचे आधार अपडेट नाही अश्या लाभार्थ्यांनी आधार केंद्र व बँकेत जाऊन आधार व मोबाईल नंबर संलग्नित करुन घ्यावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, सोलापूर श्रीम. सुलोचना सोनवणे यांनी केले आहे. .
Reactions

Post a Comment

0 Comments