ब्रिजधाम आश्रमात सदाबहार गीतांसह जागतिक हास्यदिन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ब्रिजधाम आश्रम, सोरेगांव येथे 2001 पासून प्रत्येक रविवारी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याप्रमाणे रविवार दि.४ में रोजी शुभ गीतांजली ग्रुप च्या वतीने सुनहरें सदाबहार नगमें हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम यशस्वी पणे सादर केला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली.त्यानंतर ऐ मेरे हमसफर,इस प्यार से मेरी ,तुजसंग प्रीत लगाइ सजना,आपकी आखोमें कुछ ,मेरी तरह तुमभी, बासुरियां अब यही पुकारे , तुम्ही मेरे मंदिर,शायद मेरी शादीका खयाल,तुमसें जो देखतेही प्यार हुंवा , लूटे कोई मनका नगर , ये वक्त ना खो जाये ,नाम गुम जाएगा अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.ही गाणी संगीता कोळी ,संजीवनी चौगुले, दयानंद ढेकळे, पद्मा खमितकर यांनी अतिशय सुंदर पध्दतीने सादर केली.
कार्यक्रमाचे गाण्यांसह सूत्रसंचालन डॉ.सुरेश खमितकर यांनी अतिशय सुंदर पध्दतीने करुन जागतिक हास्य दिनाची माहिती देऊन उपस्थित प्रेक्षकांना हसण्यासाठी प्रव्रुत्त केले.
त्यावेळी सर्वच प्रेक्षकांनी मनमोकळेपणाने मोठ् मोठ्याने हसून हास्यदिन साजरा केला.
यावेळी कार्यक्रमाचा समारोप ब्रिजमोहन फोफलियांच्या मनोगताने झाला.त्यावेळी त्यांनी विनोद सांगितले तसेच मातापित्यांच्या सेवेसारखे दुसरे पुण्य नसल्याचे सांगून सर्वप्रथम आई-वडिलांची सेवा करण्याबाबत यावेळी आवाहन केले.कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जेवणाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments