Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज व परिसरातील रेशन दुकाने गुन्हेगार व राजकीय लोकांच्या ताब्यात

 अकलूज व परिसरातील रेशन दुकाने गुन्हेगार व राजकीय लोकांच्या ताब्यात



"सामान्य नागरिक घाबरतात रेशन घ्यायला"

अकलूज (विलास गायकवाड):- अकलूज व परिसरातील बहुतांश स्वस्त धान्य दुकाने, ही गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या, मंडळींच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सदरचे स्वस्त धान्य दुकानदार, आपल्या मर्जीनुसार दुकाने उघडतात तर ओळखीच्या लोकांना माल वाटप करून, उरलेला माल काळ्या बाजारात विक्री करत असल्याची चर्चा, सध्या गोरगरीब जनतेत सुरू आहे.तसेच काही स्वस्त धान्य दुकान चालक गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे, सामान्य जनता या दुकानदारांना भांडू शकत नाहीत अथवा त्यांची तक्रार करू शकत नाहीत.

दुकानात माल विक्री करण्यासाठी बसणारे लोक हत्या, हत्या करण्याचा उद्देशाने गंभीर जखमी करणे, निवडणुकांमध्ये गोंधळ घालने, आर्थिक फसवणूक, खाजगी सावकारकी, मारामारी या सारख्या गुन्ह्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाऊन सजा भोगलेले लोक आहेत असे समजते.

शासनाने कोणत्या निकषाच्या आधारे या लोकांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना, रेशन दुकाने दिली आहेत. आमची जिल्हाधिकारी यांना नम्र विनंती आहे की या सर्व रेशन दुकानदारांची चौकशी करून, सदरची दुकाने त्यांच्याकडून काढून स्वच्छ चारित्र्याच्या लोकांना, ही दुकाने चालविण्यास द्यावीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुंड प्रवृत्तीचे स्वस्त धान्य दुकाने चालक रेशनचां तांदूळ १५ रूपये व गहू २० रुपये दराने बाजारात विकतात असे समजते. अनेक रेशन दुकानदाराने ई-केवायसी  करण्याकरिता 200 रुपये घेतल्याची चर्चा आहे.तसेच  दर महिन्याला हे दुकानदार,युनिट प्रमाणे माल न देता, माल कमी देतात असेही समजले. पण सामान्य लोक यांच्या गुंडगिरीला घाबरून आवाज उठवत नाहीत. तरी मा. जिल्हाधिकाऱ्यांनी या दुकानदारांच्या, दुकानात बसून माल वाटप करणाऱ्या व्यक्तींच्या चारित्र्याची पडताळणी करावी व ही दुकाने बरखास्त करावीत असे सर्व सामान्य जनतेचे मत आहे.

*चौकट*
*चौकशी करून कारवाई करणार - माळशिरस तहसीलदार सुरेश शेजुळ* 
अकलूज मधील काही स्वस्त धान्य दुकानदार गुंड प्रवृत्तीचे आहेत ते जेल मधून जाऊन आलेले आहेत, मोठ मोठ्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग असताना, त्यांच्याकडे स्वस्त धान्य दुकाने कोणत्या निकषाने देण्यात आली आहेत, तसेच गरीब जनतेला वेळेवर धान्य मिळत नाही, सदरचे लोक गुंड वृत्तीचे असल्यामुळे, त्यांची तक्रार कोणी करू शकत नाहीत. याबद्दल माळशिरस तहसीलदार सुरेश शेजुळ यांना विचारले असता ते म्हणाले, स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी करून, नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तर पुरवठा अधिकारी केमकर यांना फोन लावला असता, त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.

Reactions

Post a Comment

0 Comments