अक्लकोट नगरीत गुंडांचा धुमाकूळ
अक्लकोट(कटूसत्य वृत्त):-स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भक्ताची छेड काढल्याचा जाब विचाला. दरम्यान, पाच ते सहा जणांनी नाशिकमधून आलेल्या त्या तीन भाविकांना मारहाण केली. या मारहाणीत तिघे भक्त जखमी झाले. ही घटना मंगळवार, १३ मे रोजी घडली. या घटनेनंतर लोकप्रतिनिधींना दखल घ्यावी, अशी मागणी भक्तांमधून होत आहे. या घटनेत स्वामी भक्त उमेश साळुंके, राहुल साळुंके आणि सुरेखा साळुंके (वय ३२, तिघे रा. तळवाडे, ता. मालेगाव, जि. नाशिक) अशी जखमींची नावे आहेत. पोलिस सूत्राकडील माहितीनुसार ते तिघेही मंगळवारी रात्री ९:४० वाजता गाडी पार्किंग करून नाशिकचे भक्त दर्शनासाठी जात होते. दरम्यान, बालाजी हॉटेलसमोर काही टवाळखोर एका महिलेची छेड काढत होते. त्यावेळी या तिघांनी या टवाळखोरांना थांबवून जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे अनोळखी पाच ते सहा जणांनी या तिघांना बेदम मारहाण केली. त्यामुळे दर्शन न घेताच हे तिघेही सोलापूरला आले. येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले.
0 Comments