Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार नितेश राणेंविरोधात वॉरंट

 आमदार नितेश राणेंविरोधात  वॉरंट

 मुंबई (कटूसत्य वृत्त):-शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांना गुरुवारी जामीनपात्र वॉरंट बजावले आहे. मागील सुनावणीवेळी राणे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले  होते. गुरुवारी सुनावणीदरम्यान राणे न्यायालयात अनुपस्थित राहिले. त्यामुळे माझगाव न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी राणे यांना जामीनपात्र वॉरंट बजावले. तसेच, प्रकरणाची सुनावणी २ जून रोजी ठेवताना राणे यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले. राणे यांनी २ जून रोजी न्यायालयात उपस्थित राहून वॉरंट रद्द करता येईल. यापूर्वीही खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित न राहिल्याबद्दल न्यायालयाने राणेंच्या नावे अनेकदा जामीनपात्र वॉरंट बजावले आहे. प्रकरण काय? दोन वर्षांपूर्वी, राणे यांनी राऊतांना साप म्हणून संबोधले होते. तसेच, राऊत हे उद्धव ठाकरेंना सोडून त्याच वर्षी जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होतील, असा आरोप केला होता. त्यानंतर, राऊत यांनी राणे यांच्याविरोधात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली होती व बदनामीप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

Reactions

Post a Comment

0 Comments