शिव-शंभो गर्जना फोक मराठी कॉन्सर्ट
सोलापूर शहरात प्रथमच संभाजी आरमारचे आयोजन
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमार संघटनेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त शिव-शंभो गर्जना या फोक मराठी कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. नॉर्थकोर्ट मैदान, सोलापूर येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. सध्या महाराष्ट्रात शिवप्रेमी जनतेच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या अभिजित जाधव व अम्मू जाधव निर्मित या लोकप्रिय कार्यक्रमाचे सोलापूर शहरात प्रमथच संभाजी आरमारने आयोजन केले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आयोजनाच्या धर्तीवरच या भव्य-दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील स्फूर्ती गीतांसोबतच मराठी परंपरा, देशभक्तीपर गीते देखील सादर केली जाणार आहे. तरुणाईला आपल्या तालावर थिरकायला लावणारा हा कॉन्सर्ट सध्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत असून शिवप्रेमी मावळ्यांमध्ये या कार्यक्रमाची जबरदस्त क्रेझ आहे. संभाजी आरमारने स्थापनेपासूनच छत्रपतींच्या विचारांचा जागर करणाऱ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांची परंपरा जोपासली असून नामवंत शाहीर, कलाकारांचे जलसे तसेच व्याख्यानांचे आयोजन यापूर्वी केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचा रोमांचकारी प्रेरणादायी इतिहास अनुभवण्यासाठी तमाम सोलापूरकर तसेच शिवप्रेमी जनतेने सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केले आहे.
0 Comments