"ऑपरेशन सिंदूर" च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ अकलूज येथे तिरंगा पदयात्रा
माळशिरस (कटूसत्य वृत्त):- देशाच्या सीमांवर _सतत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत, आपल्या शूर सैनिकांनी अविरत जागरूकतेने भारतमातेचे आणि देशवासीयांचे संरक्षण करत आपल्या प्राणांचे अर्पण करण्यास देखील मागेपुढे पाहिले नाही. या सैनिकांच्या अद्वितीय शौर्याला, निस्सीम देशभक्तीला आणि अमोघ सेवाभावाला विनम्र अभिवादन करण्यासाठी, त्यांचे मनोबल व आत्मविश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, माळशिरसचे मा आ राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि 23 रोजी सायं 5.00 वा अकलूज येथे भव्य तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य पाकिस्तान मध्ये घुसून त्यांचे 9 दहशतवादी अड्डे उध्वस्त केले 100 पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. पंतप्रधानांनी या हल्ल्यानंतर सांगितले आहे येथून पुढे असे हल्ले झाल्यास त्याची पुनरावृत्ती आमच्याकडून युद्धाच्या माध्यमातून होईल. दोन दिवसांमध्ये पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सैनिकांचे अभिनंदन करण्यासाठीऑपरेशन सिंदूर" च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ अकलूज येथे भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या तिरंगा यात्रेस अकलूज येथील सदुभाऊ चौकातून शुक्रवारी सायं 5.00 वा सुरुवात होणार असून गांधी चौक मार्गे ही पदयात्रा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या नजीक संपन्न होणार आहे या तिरंगा यात्रेत हजारोंच्या संख्येने अकलूज सह माळशिरस तालुक्यातील देशप्रेमीनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments