Hot Posts

6/recent/ticker-posts

अनगरच्या पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.32 टक्के

 अनगरच्या पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.32 टक्के



अनगर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी  बोर्ड परीक्षेत कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगर  येथून 299 विद्यार्थ्यांपैकी 291  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विद्यालयाचा शेकडा निकाल 97.32 % इतका आहे 90% पेक्षा अधिक गुणांची विद्यार्थी 9 असून विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी 97 आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा प्राचार्य चंद्रकांत ढोले यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यालयातील पहिले तीन क्रमांकाचे  विद्यार्थी खालील प्रमाणे 
1) प्रतीक प्रशांत शिंदे 96%
2) कुमारी ईश्वरी मुकुंद गोटे 95.40%
3) कुमारी रचना राजेंद्र मते 94.60%
3) तनिष्क गणेश सोनटक्के 94.60
 सर्व उत्तीर्ण  विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील संस्था अध्यक्ष तथा लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील प्राचार्य चंद्रकांत ढोले, प्राचार्य डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील मुख्याध्यापक संजय डोंगरे  पदाधिकारी ग्रामस्थ पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments