Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार विभागाच्या जी.डी.सी.आणि ए, व सी.एच.एम.परिक्षा 23 मे पासून सुरु

 सहकार विभागाच्या जी.डी.सी.आणि ए, व सी.एच.एम.परिक्षा 23 मे पासून सुरु



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सहकार विभागामार्फत माहे मे, 2025 मध्ये घेण्यात येणारी जी. डी. सी. अॅन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षा दि. 23, 24 व 25 में 2025 रोजी सिध्देश्वर प्रशाला, सिध्देश्वर पेठ, सोलापूर या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
सदर परिक्षेसाठी परीक्षार्थीना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ज्या परिक्षार्थिंना तांत्रिक कारणास्तव ऑनलाईन प्रवेशपत्र मिळू शकले नाही आणि ज्या परिक्षार्थिचा मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून प्राप्त हजेरीपटामध्ये समावेश आहे अशा परीक्षार्थीना परिक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येईल. अशा परिक्षार्थीनी स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड इ.) सोबत आणणे आवश्यक आहे. असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा केंद्र प्रमुख, जी.डी.सी. अॅन्ड ए परिक्षा केंद्र सोलापूर किरण गायकवाड यांनी कळविले आहे.
00000
Reactions

Post a Comment

0 Comments