Hot Posts

6/recent/ticker-posts

एनटीपीसी सोलापूरमध्ये ‘बालिका सशक्तिकरण अभियान - 2025’चा भव्य शुभारंभ

 एनटीपीसी सोलापूरमध्ये ‘बालिका सशक्तिकरण अभियान - 2025’चा भव्य शुभारंभ



सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- एनटीपीसी सोलापूरमध्ये आज ‘बालिका सशक्तिकरण अभियान (GEM)-2025’चा भव्य शुभारंभ करण्यात आलाया प्रसंगी सोलापूरच्या डीसीपी (क्राईमसौदीपाली काले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्याउपस्थित पालकांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, "आपल्या मुली खूप नशिबवान आहेत ज्यांना या कार्यशाळेचा भाग होण्याची संधी मिळाली आहेइथे शिकलेल्या गोष्टी त्या नियमित करत राहिल्या तर भविष्यात त्या आपले  आपल्या देशाचे नाव उज्वल करतील."
या कार्यक्रमासाठी एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक बी.जे.सीशास्त्रीमहाप्रबंधक (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) एम.केबेबीसृजनात्मक महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पद्मा शास्त्री  इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संचालक बी.जे.सीशास्त्री यांनी सांगितले, "GEM हा केवळ एक कार्यक्रम नाहीतर हा एक संकल्प आहे – मुलींना सक्षम बनवण्याचात्यांना पाठिंबा देण्याचा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचाया मुली म्हणजे फक्त लहान मुले नाहीततर त्या आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत."
बालिका सशक्तिकरण अभियान (GEM)’ ही एक चार आठवड्यांची निवासी उन्हाळी कार्यशाळा आहेया कार्यशाळेत प्रकल्प प्रभावित गावातील 10 ते 12 वर्षे वयोगटातील, 5वी उत्तीर्ण मुलींची निवड केली जातेकार्यशाळेत इंग्रजीहिंदीमराठीगणित यासारख्या विषयांचे शिक्षण दिले जाते आणि कलाखेळयोग याचा देखील समावेश असतोजेणेकरून मुलींचा सर्वांगीण विकास साधता येईल.
या वर्षी अहेरवाडीहोटगीहोटगी स्टेशन  तिल्लेहाल गावांमधील एकूण 42 मुलींची निवड झाली आहेत्यांना इंग्रजीगणितविज्ञानयोगआत्मरक्षणकलासंगीत आणि इतर सृजनशील कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईलत्यांना आरोग्य तपासणीपोषक आहारआवश्यक साहित्यगणवेश  शैक्षणिक साधनांची सुविधा दिली जाईल.
कार्यक्रमाच्या शेवटीचार सर्वोत्तम विद्यार्थिनींना एनटीपीसी टाउनशिप स्कूलमध्ये संपूर्ण शिष्यवृत्तीवर प्रवेश दिला जातोहा उपक्रम केवळ शिक्षणापुरता मर्यादित नसूनआत्मविश्वासनेतृत्व आणि समान संधी यासाठी एक मजबूत पाया घालतो.
Reactions

Post a Comment

0 Comments