पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा परदेश नीती मध्ये अपयशी
इंडिया आघाडीच्या खासदारांचे संसद भवन समोर निदर्शने
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- अमेरिकेने भारताच्या आयातीवर 26% शुल्क लावले असून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा परदेश नीती मध्ये अपयशी ठरल्याचा परिणाम आहे या विरोधात खा. प्रणिती शिंदे सह काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांचे संसद भवन समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
अमेरिकेने भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 26% शुल्क (टँरीफ) लावायचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क 9 एप्रिल 2025 पासून सुरू होईल. यामुळे भारतीय व्यापारावर मोठ्ठा परिणाम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत अमेरिका संबंधाचे नेहमीच गुणगान गात असत पण ते पोकळ दिखावा होता हे दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार व्यापार वाटाघाटी करण्यात आणि विदेश नीती राबविण्यात अपयशी ठरली आहे हे सरकारचा नाकर्तेपणा असून याविरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी नवी दिल्ली तील संसद भवन परिसरात निदर्शने आंदोलन केले.
0 Comments