हिंदुस्तान फीड्स यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप
सांगोला (कटूसत्य वृत्त):- महिम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पद्मसिंह पाटील माध्यमिक विद्यालयात पाचवी ते नववी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हिंदुस्तान कॅटल फीड्स या कंपनीच्या वतीने हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे.यामध्ये एक स्कूल बॅग,टिफिन बॅग, टिफिन व सॅनिटरी पॅड यांचा समावेश होता. या कार्यक्रमास हिंदुस्तान फीड्स कंपनीचे मार्केटिंगचे निलेश इंगळे, विजय साखरे, गुरुदत्त दूध संस्थेचे चेअरमन संतोष चौगुले,सचिव बाळासाहेब बंडगर,संचालक बिभीषण पाटील,रामदास भुसनर,सिद्धनाथ दूध संस्थेचे रणजीत रुपनर,माजी उपसरपंच दीपक रुपनर,नागनाथ लवटे,शंकर कारंडे, मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांचेसह पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी ह्या मदतीबाबत समाधान व्यक्त करत हिंदुस्थान फिड्स कंपनीच्या या उपक्रमामुळे शालेय जीवन समृद्ध होईल अशी भावना व्यक्त केली.
फोटो ओळ - महिम(ता.सांगोला) : येथील विद्यार्थ्यांना हिंदुस्थान फिड्स
वतीने मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना मान्यवर
0 Comments