अकलूज मध्ये मोठ्या उत्साहात डॉ.आंबेडकर जयंती साजरी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती अकलूजसह परीसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार घालुन व पंचशील ध्वजारोहन करून, अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त 13 एप्रिलच्या रात्री 12 वाजता आंबेडकर चौक येथे फटक्याची आतिषबाजी करत अभिवादन करण्यात आले.13 एप्रिल रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले.यावेळी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सामुदायिक त्रिशरण,पंचशील ग्रहन करुन भिम स्तुती भिम वंदना पठण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील,पांडुरंग देशमुख, सयाजीराजे मोहिते-पाटील,अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे,माजी सरपंच विठ्ठलराव गायकवाड, दादासाहेब मोरे,नंदकुमार केंगार,उत्तमराव माने शेडगे,भारतीय बौद्ध महासभेचे प्रविण लोंढे,बाळासाहेब गायकवाड,नागेश लोंढे आदीसह बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.
अकलूज बरोबरच परीसरातील माळीनगर, शंकरनगर, उदयनगर,आनंदनगर,संग्रामनगर कोंडबावी आदी ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन जयंती साजरी केली.अकलूज मध्ये जयंतीनिमित्त भोजनदान,फळे वाटप,रक्तदान यासह प्रबोधत्मक व्याख्याने व भिमगीताचेही आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी अकलूज शहरातुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सदर मिरवणुकीची सुरुवात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.यामध्ये आंबेडकर नगर मित्र परीवार,रमामाता तरुण मंडळ,पंचशील जयंती उत्सव मंडळ, समतानगर जयंती मंडळ,भिमज्योत तरुण मंडळ,योध्दा फाउंडेशन आदी मंडळांनी आपले भिमरथ सहभागी केले होते तर महामानवला अभिवादन करण्यासाठी पुरुष,महीला व मुलासह जनसागर मिरवणुकीत सहभागी झाला होता.
0 Comments