विधान परिषद सभापतिपदी निवड झाल्याबद्दल मोहोळ ग्रामस्थांनी केलेला सन्मान प्रेरणादायी : प्रा. शिंदे
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- विधान परिषद सभापतिपदी निवड झाल्याबद्दल मोहोळ ग्रामस्थांनी केलेला सन्मान हा माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. जनतेचा आशीर्वाद आणि सहकार्य हीच माझ्या कार्याची खरी ताकद आहे. हा सन्मान केवळ माझा नसून, लोकशाही मूल्यांवर निष्ठा ठेवून कार्य करणाऱ्या प्रत्येकाच्या मेहनतीचा आणि सेवाभावी वृत्तीचा गौरव आहे, असे असे मत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
भाजप नेते तथा माजी मंत्री प्रा. शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल मोहोळ येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्र विधान परिषद अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास आहे. त्यांनी पुढील काळात यापेक्षा मोठ्या पदावर विराजमान व्हावे, अशा शुभेच्छा मोहोळ विधानसभा मतदार संघाच्यावतीने भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी प्रास्ताविक करताना दिल्या.
यावेळी ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर, लोकसेवक संजय क्षीरसागर, भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यशवंत नरोटे, शिवसेना युवा नेते सोमेश क्षीरसागर, माजी सभापती समता गावडे, काँग्रेस नेते कृष्णदेव वाघमोडे, ब्रह्मदेव गोफणे, कामिनी चोरमोले, शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते बाळासाहेब वाघमोडे, बिरुदेव देवकाते, शशिकांत गावडे, नितीन सोनटक्के, ज्ञानेश्वर भोसले, महेश सोवनी, मुजीब मुजावर, सुशील मोटे, गणेश झाडे, दिलीप पाटील, सागर लेंगरे, द्रोणाचार्य लेंगरे यांच्यासह विठ्ठल बिरुदेव देवस्थानाचे सर्व पुजारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments