Hot Posts

6/recent/ticker-posts

विकासकामांसाठी खर्च होणारा पैसा जनतेचा आहे म्हणून कामे दर्जेदार करा- खा. प्रणिती शिंदे

 विकासकामांसाठी खर्च होणारा पैसा जनतेचा आहे म्हणून कामे दर्जेदार करा- खा. प्रणिती शिंदे





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मोहोळ तालुका गांवभेट अंतर्गत आज रोजी मोरवंची, लांबोटी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निवेदने स्वीकारली. समस्या लवकर सोडविणार असल्याचे सांगितले.

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले की, मोहोळ तालुक्यातील जनतेने सर्वाधिक लीड देऊन मला खासदार म्हणून जी संधी दिली त्या संधीतून मोहोळ तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी तुमची सेवक आहे आपण हक्काने कामे सांगा. आज या ठिकाणी रस्त्याचे कामाचे भूमिपूजन होत आहे. यासाठी खर्च होणारा पैसा जनतेचा आहे त्यामुळे विकासकामे दर्जेदार करावी अशा सूचना दिल्या.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून जिल्हा रस्ते विकास योजनेतून १७ लाख निधीतून मोरवंची येथे मसले चौधरी खुनेश्वर मोरवंची बीबीदारफाळ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामाचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच कुरणवाडी गांवात खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नाने आष्टी उपसा सिंचन योजनेतुन कुरणवाडी आष्टी ओढ्यावरील बंधारे पाण्याने पुर्ण भरुन घेतले. बंधार्‍यातील पाण्याचे पुजन प्रणिती ताईच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थांनी बंधारे भरुन दिल्याबद्दल आभार मानले.

या गावभेट दौऱ्यात मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, सरपंच मोनाली मिरगे, सरपंच राहुल धोत्रे, विकास गिड्डे, सर्जेराव पाटील, विकास जाधव, नितीन चंदनशिवे, भीमराव चंदनशिवे, लक्ष्मी चट्टेपाटील, सुनीता चंदनशिवे, माऊली इंगळे, दशरथ पाटील, लक्ष्मण मगर, शंकर चव्हाण, दत्तात्रय गायकवाड, सुनील खडके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments