सभापतीपदाचा फॉर्म्युला कोणता,कोण होणार सभापती ?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा विजय झाला. माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्या ताकदीवर सोसायटीत एकतर्फी यश मिळाले. सभापती निवडीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असे दिलीप माने यांनी सांगितले. सभापती निवडताना कोणतीही अडचण येणार नाही. सगळ्यांच्या सहमतीने ही निवड होईल, असे आ. कल्याणशेट्टी यांनी सांगितले. मात्र, आता सभापती कोण, याची चर्चा बाजार समितीत सुरू झाली आहे. जागा वाटप करताना कोणता फॉर्म्युला ठरलेला होता आणि त्यावर आता कधी चर्चा होणार, हे पाहावे लागणार आहे. दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांच्यापैकी सभापती होणार की अन्य कोणाला संधी देणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
0 Comments