बीडमधील 'त्या' महिलेचा मृत्यू,
धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,
बीड(कटूसत्यवृत्त):-मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना छेडछाडीच्या प्रकरणात अडकवण्याच्या प्लॅनमध्ये सहभागी होणारी महिला मृतावस्थेत आढळली. या महिलेच्या मृत्यूविषयी वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात असून, आता त्यावर मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ती महिला कोण आहे? ते समोर येणं खूप गरजेचं आहे', असे धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना एका महिलेची छेड काढल्याच्या प्रकरणात अडकावयाचे होते. तसा प्लॅन होता. यातूनच त्यांना मारहाण करायची होती. यासाठी एक महिला देखील तयार झाली होती. मात्र, पुढे संतोष देशमुख यांचे अपहरण झाले अन् त्यात त्यांची हत्या झाली. संतोष देशमुख यांच्या हत्येत अडकवण्याचे तयार असलेल्या महिला घरात मृतावस्थेत आढळली आहे. तिची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना, ती महिला कोण आहे? ते समोर येणं खूप गरजेचं आहे. याची खात्री केल्याशिवाय बोलणं किंवा ही तिच महिला आहे का? हे पाहणं देखील महत्त्वाचा असणार आहे, असे म्हटले आहे.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना चुकीच्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यामध्ये जो आरोपींचा प्लॅन होता, तो प्लॅन करण्यामध्ये आणि टकारस्थानामध्ये सर्व आरोपी होते. ही तीच महिला आहे का? ती तिच महिला होती का? ज्या महिलेची हत्या झाली आहे का? कारण त्या महिलेचे वेगवेगळे नाव समोर येत आहेत, असे अनेक गुन्हे या महिलेकडून घडल्याची माहिती समोर येत असल्याकडे धनंजय देशमुख यांनी लक्ष वेधलं.
या सर्व प्रकरणाची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी, यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. पण, एक माहिती खरी आहे की, ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यावेळेस जे कटकारस्थान केले होते ते खरं आहे. स्थानिक पोलिसांनी काय तपास केला, याचं स्पष्टीकरण अद्यापपर्यंत कुठूनही आलेले नाही. ती महिला कोण आहे? तिची पार्श्वभूमी काय आहे? हे सर्व समोर येणं खूप गरजेचे आहे, याची खात्री केल्याशिवाय बोलणं किंवा ही तीच महिला आहे का? हे पाहणं महत्त्वाच असणार आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
0 Comments