कुणाल कामराचे मुंबई पोलिसांना उद्देशून ट्वीट,
मुंबई (कटूसत्य वृत्त):-स्टैंड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. कामराने "दिल तो पागल है" या चित्रपटातील गाण्याच्या चालीचे विडंबन करून एकनाथ शिंदें याच्याशी साधर्म्य साधत गद्दार आणि दाढीवाला म्हणत जोरदार टीका केली आहे. ज्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दुसऱ्यांदा समन्य पाठवले होते, ज्याची मुदत (31 मार्च) संपली. अटकेपासून संरक्षण मिळविण्यासाठी कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहू शकतो, अशी शक्यता होती. मात्र तो गैरहजर राहिल्याने मुंबई पोलीस त्याच्या घरी पोहचले. मात्र तो तिथे सापडला नाही. यानंतर आता कुणाल कामराने मुंबई पोलिसांना उद्देशून ट्वीट केले आहे. कुणाल कामराने दुसऱ्या समन्यला उत्तर देताना सात दिवसांचा कालावधी मागितला होता. मात्र आज दुसऱ्या समन्यचा कालावधीही संपला. कुणाल कामरा चौकशीसाठी का आला नाही? याची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक कुणाला कामराच्या माहिम येथील निवासस्थानी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पोहचले. मात्र कुणाल कामरा काही सापडला नाही. त्यामुळे माहिम पोलिसांची एक टीम कामराच्या घराबाहेर तैनात करण्यात आली आहे. यानंतर आता कुणाल कामराला तिसरं समन्य पाठवलं जाण्याची शक्यता आहे. अशातच आता कुणाला कामराने मुंबई पोलिसांना उद्देशून ट्वीट करताना म्हटले की, गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही, अशा पत्त्यावर जाणे म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक यंत्रणांचा अपव्यय करण्यासारखे आहे.
0 Comments