पंढरपूर नगर परिषदेचे हॉस्पिटल पुन्हा नागरिकांच्या सेवेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 1, 2025

पंढरपूर नगर परिषदेचे हॉस्पिटल पुन्हा नागरिकांच्या सेवेत

 पंढरपूर नगर परिषदेचे हॉस्पिटल पुन्हा नागरिकांच्या सेवेत


आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ
पंढरपूर : (कटुसत्य वृत्त):- अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले पंढरपूर नगरपरिषदेचे हॉस्पिटल पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलचा शुभारंभ पाडव्याच्या मुहूर्तावर आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, रा. पा. कटेकर, किरण घाडगे, विक्रम शिरसट, नागेश जाधव यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.
१०० वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर नगरपरिषदेचे हॉस्पिटल अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होते. आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या आमसभेत पंढरपूर शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेचे यांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा हॉस्पिटल बंद असल्याची तक्रार करण्यात आला. नगरपरिषदेचे
केल्याने आमदार अभिजित पाटील हॉस्पिटल गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले. सामान्य नगरिकांच्या सेवेसाठी हॉस्पिटल सुरू झाल्याने पंढरपूर शहर व परिसरात आनंदाचे वातावरण झाले आहे. यातूनच हजारो गरजू रुग्णांना माफक दरात आरोग्यसेवा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages