जयहिंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत यश
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इ. 8 वी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत क. तडवळे येथील जयहिंद विद्यालयाने आपला चढता आलेख कायम राखत यावर्षी विद्यालयातून एकूण 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.त्यापैकी समर्थ सोमनाथ शिंदे हा विद्यार्थी एन. एम. एम. एस शिष्यवृत्तीधारक झाला असून त्यास इ. 9 वी ते 12 वी या शैक्षणिक कालावधीत दरवर्षी 12000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच सार्थक महादेव होगले, ईश्वरी सोमनाथ पवार, जयजीत जयसिंग जाधव, कल्याणी सुरेश गुळवे, विराट विनोद जमाले, ऋतुजा ज्ञानेश्वर बारवकर, समर्थ सचिन बोंगाळे, दिव्या अशोक करंजकर, कार्तिक प्रदीप लंगडे, आर्यन महावीर डोके, अदिती प्रशांत होगले, अक्षरा लहू शिंदे, समर्थ सुरेश घुटे, श्रावणी सोमनाथ कदम, कल्याणी पांडुरंग उचले असे एकूण 15 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीधारक झाले असून त्यांना इ. 9 वी ते 12 वी या कालावधीत दरवर्षी 9600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा क. तडवळे येथील विशाल जमाले, उपसरपंच हारुण शेख, शिक्षणप्रेमी नागरिक अरुण पाटील, शा. व्य. समितीचे उपाध्यक्ष हनुमंत पवार, मुख्याध्यापक आर. डी. गाढवे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ए. आर. घोडके, आर. जी. कोकणी, ए. जी. कोरडे, जे. बी. बोराडे, एस. एस. पाटील, एस. टी. पालके, श्रीमती क्षीरसागर व स्पर्धा परीक्षा प्रमुख पी. के. ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे शि. शि. प्र. मंडळ, बार्शी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शा. व्य. समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा. पं. सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. डी. गाढवे,
0 Comments