Hot Posts

6/recent/ticker-posts

वाहन धारकांच्या सोयीसाठी मोडनिंब येथे आरटीओ कॅम्प

 वाहन धारकांच्या सोयीसाठी मोडनिंब येथे आरटीओ कॅम्प



अकलूज आरटीओ कार्यालयाचा उपक्रम
मोडनिंब (कटुसत्य वृत्त):- अकलूज आरटीओ कार्यालयातर्फे मोडनिंब येथे नियमित कॅम्प भरवला जातो. या कॅम्पचा मोडनिंब परिसरातील नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन अकलूज आरटीओ कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
मोडनिंब परिसरातील शेटफळ, बावी, पडसाळी, अरण, वरवडे, तुळशी, सोलंकरवाडी, गायकवाड वाडी, जाधववाडी, बैरागवाडी, लऊळ, सिद्धेवाडी, आष्टी, बार्डी, तेलंगवाडी या गाव परिसरातील नागरिकांची सोय व्हावी. कच्चे व पक्के लायसन नागरिकांना वेळेवर मिळावे याकरिता मोडनिंब येथे अनेक वर्षांपासून कॅम्प सुरू करण्यात आला आहे.
मोडनिंब परिसरातील सर्व गावातील गरजूंना अकलूज हे ठिकाण दूर आहे. अकलूज येथून गणेश मंदिर येथे असणारे आरटीओ कार्यालय गैरसोयीचे होत आहे. गरजू नागरिकांची सोय
व्हावी, त्यांचा वेळ वाचावा, इंधन वाचावे, प्रवासातील धोका वाचावा, त्यांना वेळेत लायसन्स मिळावीत हा सकारात्मक विचार ठेवून संबंधित कार्यालयाने मोडनिंब येथे कॅम्प ठेवला आहे. गरजू नागरिकांनी कॅम्पचा लाभ घेतल्यास त्यांना वेळेवर लायसन्स उपलब्ध होतील. कॅम्प कधी भरणार याची तारीख नागरिकांना माहीत नसल्यामुळे अनेकदा अडचण येते. याबाबत संबंधित कार्यालयाने नागरिकांना कळविणे गरजेचे आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कॅम्प
मोडनिंब येथे शनिवार, दि. ७ एप्रिल रोजी आरटीओ कॅम्प भरवण्यात आला होता. नागरिकांनी
उपस्थित राहून लायसन्स वेळेवर काढून घ्यावेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून खास मोडनिंब येथे कॅम्प भरवण्यात येत आहे. सध्या नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून कॅम्पचा फायदा घ्यावा.
• हरिदास रणदिवे,
अरण (ता. माढा)
कॅम्पच्या तारखा कळवू
अकलूज आरटीओ कार्यालयामार्फत मोडनिंब येथे कॅम्पचे आयोजन करण्यात येत असते. कॅम्पच्या तारखा कॅम्प भरण्यापूर्वी कळवू. संबंधित गावातल्या ग्रुप वर टाकण्यासाठी प्रयत्न करू. नागरिकांनी कॅम्पला उपस्थित राहून लायसन बद्दलची कामे करून घ्यावीत व स्वतःचा वेळ वाचवावा.
संदीप पाटील,
निरीक्षक, अकलूज आरटीओ
Reactions

Post a Comment

0 Comments