एप्रिलअखेर होणार विमानाचे टेकऑफ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 3, 2025

एप्रिलअखेर होणार विमानाचे टेकऑफ

 एप्रिलअखेर होणार विमानाचे टेकऑफ



   



  सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर-गोव्यासाठी फ्लाय 91 या कंपनीला 72 सीटर विमानसेवेला डीजीसीआएने मंजुरी दिल्यानंतर येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस विमान टेकऑफ घेणार असल्याची शक्यता आहे. विमानसेवेसाठी लागणार्‍या इंधन पंपाचा प्रश्न आहे.परवानगी मिळाल्यानंतर आता विमान उडेल की पुन्हा प्रतीक्षा करावी लागेल, अशी सोलापुरकरांत संभ्रमावस्था आहे.

विमानसेवेसाठी अडसर ठरणारी सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी जून 2023 मध्ये पाडण्यात आली. 60 कोटी रुपये खर्च करुन होटगी रोडवरील विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या आधी सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटनही करण्यात आले. फ्लाय 91 कंपनीने डिसेंबर 2023 अखेर विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली. परंतु विमान काही उडालेच नाही. फ्लाय 91 कंपनीने 42 सीटरऐवजी 72 सीटर विमानसेवेला परवानगी मागितली. मागील दोन महिन्यांपासून परवानगी रखडली होती. अखेर आता डीसीसीआयएने परवानगी दिली असून, प्रत्यक्ष विमानसेवेला कधी सुरुवात होणार याची सोलापूरकरांना प्रतीक्षा आहे. तिकीट बुकींग आणि स्लॉट निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्षात विमानसेवेला प्रारंभ होणार आहे. ते एप्रिल महिनाअखेर पूर्ण होईल, असे जिल्हा प्रशासनातील एका अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages