शैक्षणिक नवसंशोधनात नवले दाम्पत्याचा राज्यस्तरीय सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 3, 2025

शैक्षणिक नवसंशोधनात नवले दाम्पत्याचा राज्यस्तरीय सन्मान

शैक्षणिक नवसंशोधनात नवले दाम्पत्याचा राज्यस्तरीय सन्मान

 अंकोली (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत नवले दाम्पत्याने उल्लेखनीय यश मिळवत आपला नावलौकिक वाढवला आहे.


या स्पर्धेत तालुकास्तरावर इयत्ता पहिली-दुसरी गटातून सौ. निर्मला केदारलिंगे-नवले यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर तिसरी ते पाचवी गटातील गणित विषयासाठी चंद्रकांत नवले यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.

या विजेत्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूरचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, अधिव्याख्याता शशिकांत शिंदे आणि शिक्षण विस्तार अधिकारी बापूसाहेब जमादार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नवले दाम्पत्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मोहोळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, मल्लिनाथ स्वामी, केंद्रप्रमुख राजकुमार राऊत, सिद्धेश्वर कलबुर्गी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages