एटीएममधून पैसे काढण्यासाठी बँक घेणार २५ रुपये सेवा शुल्क
सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- तुमचे ज्या बँकेत खाते व एटीएम आहे, त्या बँकेऐवजी दुसऱ्या बँकेतून रोख रक्कम काढण्यासाठी तीन वेळेस सेवाशुल्क लागणार नाही. मात्र, चौथ्या व्यवहारापासून पुढील प्रत्येक व्यवहारावर २१ रुपये सेवाशुल्क व त्यावर १८ टक्के जीएसटी असे २५ रुपये बँक वसूल करणार आहे.
ज्या बँकेत तुमचे खाते आहे, त्याच बँकेच्या एटीएमवरून रोख रक्कम काढताना पाच वेळेस सेवाशुल्क लागणार नाही. मात्र, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर २५ रुपये बँक वसूल करेल. पूर्वीही एटीएममधून रक्कम काढल्यास सेवा शुल्क १७ रुपये लागत असे. जीएसटीसह २० रुपये आकारले जातील.
एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी आता तुम्हाला जास्तीचे सेवाशुल्क व त्यावर १८ टक्के जीएसटी द्यावी लागणार आहे. कारण, आता एटीएम कार्डचा वापर करताना दहादा विचार करावा लागेल. काही बँका तर पासबुक भरल्यास नवीन पासबुकसाठी भरमसाठ पैसे घेत आहेत. तुमचे खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेच्या एटीएममधून पाच वेळेस एटीएमचे व्यवहार विनाशुल्क असतील. एटीएमने कधीकाळी मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होत
होती. परंतु, मागील काही वर्षापासून डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून व्यवहार केले जात आहेत. क्यूआर कोड आल्यामुळे व्यवहार डिजिटल झाले असले तरी रोख रक्कम काढण्यासाठी आजही एटीएमला पर्याय नाही.
चौकट 1
आरबीआयने घ्यावी कठोर भूमिका
सेवाशुल्काच्या नावाखाली बँका लुटत आहेत. मिनिमम बॅलन्सवर दंड, एटीएम व्यवहारावर सेवाशुल्क, चेक बाउन्स झाल्यास बँकांची दंडाची रक्कम एकसारखी पाहिजे. पण, बँकांकडून वेगवेगळे दंड आकारले जातात. खातेदार बँकेत पैसे ठेवतो म्हणजे गुन्हा करतो काय, असेच आता वाटत आहे. असे सेवाशुल्क दंड वसूल करून बँका नफा कमवीत आहेत, हे चुकीचे आहे. आरबीआयने यावर कठोर भूमिका घेतली पाहिजे.
0 Comments