वाशिंबे (सचिन भोईटे):- करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जागरूक देवस्थान म्हणून उजनी बॅकवॉटर परिसरातील भिमा नदीतच्या काठावरती असलेल्या वाशिंबे (ता. करमाळा ) येथील ग्रामदैवत देवस्थान श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्साहात पार पडली. मानाची पालखी, कावडी नृत्य,भैरवनाथ महाराज व जोगेश्वरीच्या विवाह सोहळा. परंपरेनुसार विधीवत आदी.कार्यक्रम पार पडले. देवाचा घोड्यावरती स्वार छबिना मिरवणुकीत भाविक भक्तांची अलोट गर्दित ' नाथ साहेबांचं चांगभलं' च्या जयघोषात वाशिंबे नगरीत हा यात्रा उत्सव संपन्न झाला. रंगबेरंगी फटाक्याच्या अतिबाजीने व आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून गेला होता.मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने पंचक्रोशीतील भक्त व अनेक भागातुन भक्तगण या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात असतात.यानिम्मिताने धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन होते. भैरवनाथ मंदिर परिसरात नुतन बांधलेल्या आखाड्यात निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. यात्रा उत्सव सोहळ्याचे नियोजन भैरवनाथ मंदिर ट्रस्ट,मानकरी,ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले.
0 Comments