सह्याद्री फार्मसी महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी :
सांगोला- (कटूसत्य वृत्त):-तालुका (प्रतिनिधी) समाजातील अनिष्ट रूढी परंपरा व अंधश्रद्धा निवारण्यासाठी जनजागृती करणारे थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे येथे उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची पूजा करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0 Comments