लोकमंगल कृषी संलग्नित महाविद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी स्थापना दिवस संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय व लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यायात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राहुरी कृषी विद्यापीठाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे, लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन, प्रा. स्वप्नील कदम, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. स्मिता धायगुडे, प्रा.निशा काटे, प्रा. सायली बेडेकर, प्रा . वर्षा मानेदेशमुख, प्रा. अंकिता पवार तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोतातून महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनकार्य विशद केले. प्राचार्य सचिन फुगे यांनी आपल्या मनोगतातून राहुरी कृषी विद्यापीठ स्थापना, विस्तार आणि कार्यक्षेत्र याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या व महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कृषी संशोधन क्षेत्रातील योगदान यासोबतच विद्यापीठाच्या कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थांना कृषी विद्यापीठातील कृषी एकता मंच याविषयी महिती दिली. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शिक्षणाद्वारे दैदीप्यमान यश संपादन करून विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे नाव कृषी क्षेत्रात उज्वल करावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. स्वप्नील कदम यांनी केले.
0 Comments