Hot Posts

6/recent/ticker-posts

मृणाली खाडे एन.एम.एम.एस परिक्षेत जिल्ह्यात पाचवी तर अद्विक बनपट्टे याने अभिरुप परिक्षेत सातवी

मृणाली खाडे एन.एम.एम.एस परिक्षेत जिल्ह्यात पाचवी तर अद्विक बनपट्टे याने अभिरुप परिक्षेत सातवी



अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी शालाबाह्य स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश संपादन केले. 
    इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यींनी मृणाली बीटाजी खाडे हिने एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परिक्षेत १८० पैकी ८४ गुण मिळवून एन.टी-ड प्रवर्गातून जिल्हा गुणवत्ता यादीत पाचव्या तर माळशिरस तालुका गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच चिरंतन रवींद्र भोके याने १८० पैकी ७६ गुण मिळवून ही परिक्षा उत्तीर्ण झाला. 
    तसेच प्राथमिक विभागातील इयत्ता चौथीतील विद्यार्थी अद्विक अमोल बनपट्टे याने अभिरुप शिष्यवृत्ती परिक्षा २०२४-२५ मध्ये सोलापूर जिल्हा गुणवत्ता यादीत सातवा  क्रमांक पटकावला तर मंथन शिष्यवृत्ती परिक्षेत ३००पैकी २७४ गुण मिळवून ९१.९५ ℅ सह "ए" श्रेणी मिळवली त्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचा  सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना  मार्गदर्शन करणार्या सहशिक्षिका विजया पेटकर आणि महेश शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आले. 
      याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक मल्हारी घुले सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश करडे सर,पालक बीटाजी खाडे आणि सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

      प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, सभापती निशा गिरमे, प्रशाला समिती सदस्य महादेव अंधारे, यशवंत साळुंखे   यांनी अभिनंदन केले. 

Reactions

Post a Comment

0 Comments