अन्नछत्र न्यास हे धार्मिक संस्कृतीचा अक्षय वटवृक्ष- ना. जयकुमार गोरे
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र न्यास हे धार्मिक संस्कृतीचा अक्षय वटवृक्ष असल्याचे मनोगत सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत सुविद्य पत्नी सोनिया जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोलबापू शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, आनंदराव तानवडे, शिवशरण जोजन, वहिदपाशा शेख, महेश हिंडोळे, मल्लिनाथ स्वामी, शिवराज स्वामी, ननु कोरबू, बसवंतराव कलशेट्टी, लखन झंपले, संतोष पाटील, आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे स्वीय सहायक धनंजय गाढवे उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.जयकुमार गोरे म्हणाले, अन्नछत्र मंडळ रुपी वटवृक्ष समाजाला उर्जावान बनवित आहे. श्रद्धा, संस्कार आणि समाजसेवेचा दीपस्तंभ असून, धार्मिकतेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा या विविध क्षेत्रातील कार्याने राज्यातच नव्हे तर देशभरात, परदेशात अन्नछत्र मंडळाचे नांव पोहचेल आहे. तालुक्यातील ७७ कुस्तीगीरांना दरमहा वजन गटानुसार देण्यात येणारा प्रसादरुपी खुराक या योजनेसह दिव्यांग, निराधार यांना समर्थ महाप्रसाद सेवा दिली जाते ही बाब राज्यातील अन्य धर्मादाय संस्था पहायला मिळत नाही, मात्र गरजा ओळखून भोसले पिता- पुत्राकडून अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून भक्त सेवेतून समाजसेवा घडत असल्याचे ना. गोरे यांनी सांगून एकाच क्षताखाली अन्नछत्र प्रगतीचे पाउल टाकत आहे. राज्यातील अन्य धर्माधाय संस्थाना अन्नछत्राचे कार्य अनुकरणीय असल्याचे ना. जयकुमार गोरे म्हणाले.
यावेळी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सनी सोनटक्के, वैभव मोरे, निखील पाटील, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, विशाल कलबुर्गी, भरत राजेगावकर, सुमित कल्याणी, विनायक भोसले, सुरज सावंत, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, स्वामिनाथ बाबर, बाळासाहेब घाडगे, नामा भोसले, संभाजीराव पवार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, महेश भोसले, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, महांतेश स्वामी, सिद्धाराम कल्याणी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, महादेव अनगले, अनिल गवळी, धानप्पा उमदी, कल्याण देशमुख, धनंजय निंबाळकर, विशाल घाडगे, रोहित कदम, खंडेराया होटकर, मल्लिकार्जुन गवळी, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments