Hot Posts

6/recent/ticker-posts

देवगड हापूस आंब्यांवर आता युनिक आयडी कोड

 देवगड हापूस आंब्यांवर आता युनिक आयडी कोड




बनावट आंब्याची विक्री रोखण्यासाठी पाऊल

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देवगड हापूस आंब्याच्या नावाने होणारी तोतयागिरी आणि बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.या वर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर 'टॅपर प्रूफ युआयडी सील' (TP Seal UID) सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महेश धाराशिवकर आणि शशी थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.
        देवगड अल्फोन्सो (हापूस) आंब्याच्या नावाने बाजारात होणारी तोतयागिरी आणि बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी 'हापूस (अल्फोन्सो) च्या भौगोलिक संकेत (GI) टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर असलेल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने या वर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर 'टॅपर प्रूफ युआयडी सील' (TP Seal UID) सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा खास TP Seal UID स्टिकर लावणे बंधनकारक असेल आणि असे युआयडी असलेले आंबेच 'देवगड हापूस' किंवा 'देवगड अल्फोन्सों म्हणून विक्री किंवा विपणन करता येणार आहे.
या उपक्रमामुळे देवगड हापूसच्या नावाखाली सर्रास होणारी बनावट आंब्यांची विक्री पूर्णतः बंद होतील आणि ग्राहकांना केवळ जीआय प्रमाणित, अस्सल देवगड हापूस आंबेच मिळतील असा संस्थेचा विश्वास आहे.
गेल्या तीन दशकांपासून इतर भागांतील निकृष्ट दर्जाचे आंबे सर्रास देवगड हापूस म्हणून विकले जात आहेत. त्यामुळे देवगडमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, त्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम देखील होत आहेत.या प्रकल्पाकरिता टिपी सील यूआयडीचे पेटंट असलेल्या संस्थेने मुंबई स्थित सन सोल्यूशन्स संस्थेबरोबर करार केला आहे असे महेश धाराशिवकर आणि शशी थोरात यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments