सोलापूरसह अनेक जि.प.मध्ये अतिरिक्त शिक्षकांमुळे होणार नाही नवी पदभरती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७७ शाळांमध्ये सध्या शिक्षकांची ७०० पदे रिक्त आहेत. सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीत तेवढीच पदे भरली जातील, अशी आशा होती. मात्र, पटसंख्येअभावी नवीन संचमान्येच्या निकषांनुसार तेवढीच पदे अतिरिक्त होणार असल्याने शिक्षक भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला एकही नवा शिक्षक मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशीच स्थिती राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमधील आहे.
सोलापूर जिल्ह्यात नव्याने वाढणाऱ्या एलकेजी, यूकेजी व पहिली ते चौथीपर्यंतच्या इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांची संख्या ४०० हून अधिक आहे. २०२४-२५ या एका वर्षात जिल्ह्यात सुमारे ५० इंग्रजी शाळा वाढल्या आहेत. याशिवाय 'सीबीएससीई'सह अन्य बोर्डाच्या इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांच्याही शाळांची संख्या ६० पेक्षा जास्त आहे. शहराबरोबरच गावागावांतील पालकांचा कल आता बदलल्याने मराठी शाळा विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पट झपाट्याने कमी होऊ लागला आहे.
0 Comments